राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री
महाराष्ट्र
राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री
April 13, 2021
नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात उद्या (दि. 14) रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून ब्रेक द चेन अंतर्गत पुढचे 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
आज रात्री जनतेला संबोधित करतांना मुख्यमंत्र्यांनी काही बंधने व आर्थिक सहाय्य जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले काही मुद्दे खालील प्रमाणे आहेत
*ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात 144 कलम 15 दिवसांसाठी लागू होणार
*अनावश्यक येणे जाणे बंद होणार
*अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये
*स 7 ते रात्री 8 मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.
*सार्वजनिक वाहतूक केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार
*पावसाळीपूर्व कामे सुरू राहणार
*इ कॉमर्स, पेट्रोल पंप कार्गो सेवा सुरू राहणार
*खासगी आस्थापना बंद राहणार
*हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये फक्त टेक अवे किंवा होम डिलिव्हरी सुरू राहणार
*राज्य शासनाच्या वतीने 7 कोटी जनेतेला अन्न सुरक्षा योजने अंतर्गत प्रत्येकी 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ 1 महिना मोफत देणार.
*शिवभोजन थाळी रोज सुमारे 2 लाख लोकांना पुढील 1 महिना मोफत देण्यात येणार.
*नोंदणीकृत बांधकाम 12 लाख कामगारांना 1500 रुपये देणार
*नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार
*अधिकृत 5 लाख फेरीवाल्यांना 1 वेळेसाठी 1500 रुपये देणार
*परवानाधारक 12 लाख रिक्षाचालकांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य देणार
*3000 कोटी रुपयांचा निधी कोविड साठी बाजूला काढला आहे
*कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वैद्यकीय सुविधांवर भार वाढतो आहे. क्षमतेपेक्षा अधिक भार वाढल्याने अहवाल यायला उशीर होतो आहे. राज्यात ऑक्सिजन कमी पडतो आहे.
*रेमडेसिव्हीरची मागणी प्रचंड वाढली आहे.
*आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या
*ऑक्सिजनची आणखी गरज असल्याने इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची केंद्राकडे परवानगी मागितली आहे.
हवाई मार्गाने लष्कराच्या मदतीने ऑक्सिजन आणण्याची परवानगी ची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
*जीएसटी परतावा देण्यासाठी मुदत वाढवावी.
*ही आलेली आपत्ती विचित्र आहे.
*लस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती यायला काही काळ लागतो.
*लसीकरणाचा वेग वाढवला आहे.
*सध्याची रुग्णवाढ भयावह
*नैसर्गिक आपत्तीच्या निकषाने हातावर पोट असलेल्यांना वैयक्तिक मदत केंद्राने द्यावी, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली.
*गेल्या वर्षीच्या लाट थोपवली, दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा तोकडी पडतांना दिसते आहे.
*परदेशात लस दिल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे.
*नाईलाजाने बंधने घालावी लागणार आहेत.
*रोजी रोटी महत्वाची आहे, पण जीव वाचवणेही महत्वाचे ।
Leave a Reply
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment
Name *
Email *
Website
Bole tho ek dum rapchik news
महाराष्ट्र
राज्यात उद्यापासून 15 दिवस संचारबंदी : मुख्यमंत्री
April 13, 2021

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें